राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वाहन चालकाचा प्रताप… घरात घुसून महिलेला मिठी मारत केला विनयभंग… 

0
9

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

राज्यातील सत्ताधारी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वाहन चालकाने रायगड जिल्ह्यातील मुख्यालय येथील अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावातील महिलेच्या घरात कोणीही नसताना शिरून महिलेला मिठी मारीत विनयभंग केली असल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका गावात आरोपी प्रसाद अरुण भगत हा दिनांक १० मे २०२५रोजी रात्री साडे आठच्या सुमारास छत्तीस वर्षीय पीडित महीला हिची मोठी मुलगी ही कामावर गेलेली असताना तसेच लहान मुलगी ही शेजाऱ्याकडे खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी प्रसाद अरुण भगत हा संधीचा फायदा घेत घरात प्रवेश केला. त्यावेळी पीडित महीला ही भांडी घासत असताना मागून येऊन कमरेला मिठी मारीत विनयभंग करीत लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडित महिला ही त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करीत असताना आरडाओरडा केला म्हणून आरोपी प्रसाद भगत याने पीडित महिलेच्या कानाखाली मारली.व पळ काढला. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांच्या चालकाने केलेले प्रताप पाहून स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.

सत्तेतल्याच पदाधिकारी असलेल्या चालकाकडून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होऊ लागला आहे. या घटनेनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटानी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक मराठे हे करीत आहेत.