वडगांव शाळेला सुट्टी नाही… समर कॅम्प बरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारणार… 

0
46

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

आदर्श माझी शाळा पुरस्कार विजेती शाळा वडगांव येथे विद्यार्थी समर कॅम्प, पाढे पाठ करीत आहेत…. त्यामुळे येथील विद्यार्थी यांचा शिक्षण स्तर उंच होईल….
रायगड जिल्हा परिषद व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने कमालच्या उन्हाळी शिबिराचे जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे…. सदर शिबिरास जिल्हाभरातून उदंड प्रतिसाद लाभत असुन, पालक वर्गात सकारात्मक चर्चा आहे…. रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगाव येथे दररोज दोन तास शिबीर चालत असून, यात भाषा, गणित या विषयांसाठी उपक्रम, खेळ, गप्पा, गाणी, पाढे असे विविध कार्यक्रम घेतले जात आहेत…. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड हे स्वतः उपस्थित राहत असून, स्वयं सेविका निकिता गडगे, भाग्यश्री तांबोळी, आकांक्षा जाधव व संचिता गडगे या सुद्धा सकाळ, दुपार व सायंकाळी वेळ देऊन सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पाडत उन्हाळी शिबिराला सहकार्य करत आहेत…. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची गोडी लागत असून, भाषिक मूलभूत कौशल्य व गणितीय संबोध दृढीकरण चांगल्या प्रकारे होत आहे…. या शिबिरास पालकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे…. शिबिरास रात्रीसुद्धा मुले उपस्थित राहत आहेत….
या उन्हाळी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत असून, यापुढे चोवीस तास चालणारी शाळा म्हणून वडगाव शाळेकडे पालक पाहतील…. पालकांनी फोनवरून संपर्क साधत शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त केले आहेत… मुख्याध्यापक सुभाष राठोड त्यांच्या शिक्षक यांच्यासह पाढे पाठ, खेळ याकडे लक्ष देत असून, चोवीस तास चालणारी शाळा म्हणून वडगांव शाळेचा उल्लेख होईल असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष करुणा रविंद्र ठोंबरे यांनी सांगितले….