महाड नगरपालिकेच्या हद्दीत मटका व्यवसायिकांवर नगर परिषदेने अखेर केली कारवाई…

0
9

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-

महाड सारख्या ऐतिहासिक क्रांती भूमीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.२० मार्च १९२७ साली चवदार तळ्याचा सत्याग्रह केला… तो मानव मुक्ती संग्राम केल्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेले भाडे ऐतिहासिक भूमी या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाड सुकट गल्ली येथे बरेच दिवस मटका व्यवसाय, ऑनलाइन लॉटरी धंदा तेजीत सुरू होता… मग ऑनलाईन लॉटरी व्यवसायाकडे पोलीस यंत्रणेचा दुर्लक्ष दिसून येत असल्याचे दिसत होते… परंतु हे मटके व्यवसाय व ऑनलाईन लॉटरी व्यवसाय महाड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुरू होते… महाड नगरपरिषद या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत होती… नगरपरिवार गाड्यांमध्ये मटका व्यवसायावरील ऑनलाईन लॉटरीवाले आपले धंदे खोलून बसले होते… महाडच्या बाजारपेठेमध्ये धंद्याला काही दिवस खूपच उत आला होता… परंतु हे मटका व्यवसाय ऑनलाइन लॉटरी व्यवसाय हे धंदे बंद करण्यास कोणी दिसत नव्हते… परंतु, महाड मधील समाजसेवक हे शिवसेना उबाठा गटाचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी महाड शहर पोलीस स्टेशनकडे लेखी निवेदन देऊन यावर कारवाई करण्याचे आदेश सुनावल्याने व महाड नगर परिषदेच्या असणाऱ्या गाड्यांमध्ये ऑनलाईन लॉटरी व मटके व्यवसाय त्वरित बंद करण्याचा आदेश महाड शहर पोलीस स्टेशन व महाड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिले असता श्री. सुभाष मोरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याची चर्चा सर्वत्र महाडमध्ये सुरू आहे… अखेर सुरू असलेले व तेजीत आलेले मटके ऑनलाईन लॉटरी हे बंद झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी अखेरचा श्वास सोडला आहे… त्यामुळे सुभाष मोरे यांना शुभेच्छा व धन्यवाद दिले आहेत… दुसऱ्या दिवशी महाड नगरपरिषदेने आपल्या गाड्या सुरू असलेले मटकी व्यवसाय ऑनलाईन लॉटरी व्यवसाय त्वरित बंद करून कारवाई केली व छोट्या मोठ्या झोपड्या महाड छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या झोपड्या आपल्या हद्दीतील तोडून टाकल्या… सद्यस्थितीत हे मटके धंदे पूर्णपणे बंद असल्याचे दिसत आहे… परंतू हे धंदे पुन्हा चालू होतील की नाही हे सांगता येत नाही त्यामुळे त्याकडे पूर्णपणे पोलीस प्रशासनाने बारकाईने लक्ष देऊन व्यवस्था ठेवली आहे… पण महाड मधील मटका आणि ऑनलाईन लॉटरी व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याचे दिसते…