अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्हा अधिकारी किशन जावळे यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत रायगड जिल्ह्यातील साळाव पुलावर ड्रोन कॅमेराचा वापर केल्याप्रकरणी जितेंद्र रामचंद्र मगर (वय ४०वर्षे पोलिस शिपाई, रेवदंडा पोलिस स्टेशन,रेवदंडा,अलिबाग,रायगड.)यांनी कुलदीप गजेंद्र उपाध्याय (वय २५वर्षे फ्लॅट नंबर पाच,पुष्कराज अपार्टमेंट,गांधी चौक,बदलापूर,ठाणे) याच्याविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून रेवदंडा पोलिसांनी दोन हजार रुपये किमतीचा ड्रोन कॅमेरा जप्त केला आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्याला जोडणाऱ्या कुंडलिका खाडीवर असणाऱ्या पुलावर दिनांक१७मे २०२५रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास कुलदीप गजेंद्र उपाध्याय याने रायगड जिल्हा अधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करीत लग्नाचे प्री वेडिंग फोटो शूटिंग करण्याच्या उद्देशाने साळाव पुलापासून समुद्र किनारा परिसर चित्रीकरण करण्याच्या उद्देशाने ड्रोन कॅमेराचा वापर करीत असताना मिळून आला.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात ६८/२०२५भा.न्या.दं.२०२३ च्या कलम २२३ (ब)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल थळे करीत आहे.काश्मिर आणि हिमाचल प्रदेश राज्यातील पर्यटन स्थळ असणाऱ्या पहेलगाम येथील निसर्ग प्रिय पर्यटनस्थळी पाकिस्तानी दहशतवादी यांनी निष्पाप पर्यटकावर बेछूट गोळीबार करीत करीत त्यामध्ये काही निष्पाप पर्यटक यांचा नाहक बळी गेला तर असंख्य पर्यटक हे जायबंदी झाले आहेत.
भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर तसेच भारताने पाकिस्तानमधील काही भागात केलेल्या स्ट्राईकनंतर सर्वत्र सावधगिरी बाळगण्याच्या सूचना संरक्षण व गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हायाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.
भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर, संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीने दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात १७ मे २०२५ ते ३ जून २०२५ या कालावधीत ड्रोन व तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.