गोवंशीय मांसची कत्तल करणाऱ्या आरोपीला अटक… कोपरगाव अहिल्यानगर येथून पेण पोलिसांची कारवाई…

0
44

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी, प्रदीप मोकल):- 

१५ डिसेंबर २०२४ रोजी सावरसई येथे गोवंशीय मास कत्तल करणाऱ्या मुख्य आरोपीला पेण पोलिसांन कडून कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६:४४ वाजता पेण-खोपोली मार्गवरील सावरसई गावाच्या हद्दीत टाटा इंट्रा कंपनीच्या टेंम्पो क्रमांक एमएच ०५ एफजे १५११ मध्ये गोवंशीय मांस कत्तल करून, गोवंशीय मांसाची वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना गोवंशीय मांसाची वाहतूक करत असताना टेंम्पोचा टायर फुटल्याने सदरचा टेंम्पो मालासह टेम्पोचा चालक आणि इतर दोघे सदरील टेम्पो सोडुन पळुन गेले होते. यातील आरोपी १) अफसर मेहबुब कुरेशी २) नजरूद्दीन निजामुद्दीन खान ३) साजिद लायक कुरेशी सर्व रा.कुर्ला, मुंबई यांना गुन्हयात अटक करण्यात आली होती. सदर गुन्हयाचा तपास सुरू असताना आरोपींनी सदरचे गोवंशीय मांस हे इसा कुरेशी रा.वैजापुर, जि.संभाजीनगर यांच्याकडून आणले असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते…गुन्हा घडल्यापासुन आरोपी इसा कुरेशी हा गेले ५ महिन्यापासुन फरार होता. आरोपी ईसा कुरेशी याचा वेळोवेळी शोध घेतला असता तो मिळुन येत नव्हता.

सदर आरोपीचा तांत्रिक विश्ष्लेषण करून तसेच,गोपनिय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखा पेण यांनी शोध घेवुन फरार आरोपी इसा युसुफ कुरेशी वय ४० वर्षे रा. मांगवाडा खानगल्ली, शेरेपंजाब हॉटेलच्या पाठीमागे, वैजापुर, जि. संभाजीनगर हा कोपरगांव जि. अहिल्यानगर येथील मार्केटमध्ये आला असल्याची बातमी मिळाली असता त्यास सापळा रचुन ताब्यात घेवुन १९ मे २०२५ रोजी अटक केली. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर अशाप्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर गुन्हयाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोसई समद बेग, सहा. फौजदर राजेश पाटील, पोह/८७३ संतोष जाधव, पोह/८६१ प्रकाश कोकरे, पोह/१५६८ अजिंक्य म्हात्रे, पोह/१४२४ सुशांत भोईर, पोह/८८५ सचिन व्हस्कोटी, पोना/२३१९ अमोल म्हात्रे, पोशि/१९५१ गोविंद तलवारे यांनी केला.