कोल्हारे ग्रामपंचायतीत भावी सरपंच जोत्सना विरलेंनचे बॅनर झळकले… कोणतेही पद नसताना महिलांना व विद्यार्थ्यांना केली मदत…

0
50

 नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

कोल्हारे तसेच नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या भावी सरपंच म्हणून जोत्सना विरले यांचे बॅनर लावण्यात आले आहेत.व त्यामध्ये ज्योत्सना महेश विरले यांचे नाव प्रामुख्याने पाहावयास मिळत आहे…त्या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायत हद्दीतील महिला वर्गांची मुलाखत घेऊन त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेतली.या मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला असता,कोणतेही पद नसताना विशेष करून महिलांना व विद्यार्थ्यांना केलेले मदत कार्य समोर येत आहे…

एक महिला मृत्यूच्या दारात असताना तेथे ॲम्बुलन्स येत नसल्याने त्यांनी जोसना यांना मदतीचा हात मागितला असता त्या स्वतःड्रायव्हिंग करून त्या महिलेला रुग्णालयात नेऊन त्यांचे प्राण वाचविले तसेच बचत गट काय आहे ?याबाबत ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून रोजगार निर्मितीसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न भावी सरपंच जोत्सना विरले यांनी केले आहे असे सांगण्यात येत आहे.त्या सरपंच व्हाव्या म्हणून असंख्य महिला त्यांना मदत करत आहेत. हे या बॅनरवरून व मुलाखतीवरून सर्वांच्या मनात जोस्त्ना विरले यांनी घर केले आहे असे दिसत आहे.कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये महिला आरक्षण असल्यामुळे विविध चर्चांना उधाण येत आहे.