पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पनवेल-उरण महाविकास आघाडीच्यावतीने बुधवार दि. २१ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पनवेल ते पनवेल महानगरपालिकापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत ,शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, माजी आमदार ऍड. हुस्नबानू खलिफे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, काँग्रेसचे जेष्ठ नेते कलावत, हेमराज म्हात्रे, शेकापचे जेष्ठ नेते काशिनाथ पाटील, अनील ढवळे, समजवादी जिल्हा अध्यक्ष अनील नाईक, महिला आघाडी उपजिल्हा संघटीका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख, तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुरुष पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.