खारघर बेलपाडा गॅरेजलाईनसमोर क्रेटा कारचा भीषण अपघात… अपघातात चालक किरकोळ जखमी…पोलीस घटनास्थळी गैरहजर…

0
29

खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

            नवी मुंबईतील खारघर सेक्टर-३ बेलपाडा गॅरेजलाईन समोर गुरुवार दि. २२ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास क्रेटा कारचा भीषण अपघात झाला.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वेट लिफ्ट मशीनवर म्हणजेच (कलर क्रेनवर) आदळली. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर बराच वेळ पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाहीत,यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते…

याबाबत सविस्तर घटना अशी की,क्रेटा कार क्रमांक DU 5CU 3851बेलपाडा रस्त्यावरून भरधाव वेगात जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वेट लिफ्ट मशीनवर म्हणजेच (कलर क्रेनवर)आदळली…धडकेनंतर क्रेटा गाडीचा समोरील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला…यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली असून,स्थानिकांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.वेट लिफ्ट मशीनही अपघातामुळे वाकलेले दिसत आहे.घटनास्थळी नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. मात्र,स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अपघातानंतर दीर्घकाळ पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाहीत त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली.घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी वाहतूक सुरळीत केली…मात्र वाहतूक पोलीस,स्थानिक पोलीस उपस्थित नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे…  या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून,रस्त्यावरील वेगमर्यादेचे पालन करणे किती आवश्यक आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे…