महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये तिरंगा रॅली… काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तिरंगा रॅलीत सामील…

0
101

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

             काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरामध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन बुधवार दिनांक २१ मे रोजी सकाळी ११ वाजता उरण तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आले होते.भारत देशाच्या सीमांवर आपल्या जवानांनी दाखवलेला पराक्रमाचा, त्यागाचा आणि शौर्याचा सन्मान व समर्थन दर्शवण्यासाठी आपली देशभक्ती दर्शवत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या तिरंगा रॅलीमध्ये सामील झाले होते.गांधी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भारत माता की जयच्या घोषणा देत सहभागींनी भारतीय सैन्य दला बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

काश्मीर पहलगाममधील निष्पाप पर्यटकांवर पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी जीव घेणा हल्ला केला.पाकिस्तानने सदर आतंकवादी यांना न पकडता त्यांना मदत केली.त्यामुळे भारताने प्रतिकार केला त्यानंतर पाकिस्तानवर सैनिकांनी केलेला हल्ला हा अतिशय योग्य होता.देशाच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी,राजीव गांधी, डॉ मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही भारतीय सैन्यानी पाकिस्तानला या अगोदर धडा शिकविण्याचे काम केले आहे.आज पाकिस्तानला निस्तनाबूत करण्याची संधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असताना त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार युध्दाला पुर्ण विराम देण्याचे काम केले. भारतीय सैन्यानी पाकिस्तान हे नाव जगाच्या नकाशावरुन पुसले असते असे उद्गार काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी व्यक्त करत भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रँलीत जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर,मिलिंद पाडगावकर, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,इंटक जिल्हा उपाध्यक्षा विनया पाटील,काँग्रेस तालुका महिला अध्यक्षा रेखाताई घरत,किरिट पाटील, कामगार नेते वैभव पाटील, विनोद पाटील, माजी सरपंच शंकरशेठ ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर,किरण कुंभार, घनश्याम पाटील,श्री यश घरत ,संदिप वर्तक ,लंकेश ठाकूर , मनोहर  तुळशीदास ठाकूर  तसेच आजी माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सुर्त पणे सहभागी झाले होते.यावेळी उरण पोलिसांनी संपूर्ण सुरक्षा पुरवत वाहतुकीचे योग्य ते नियोजन केले होते.