अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकपदी आयपीएस अधिकारी आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. पोलिस बल गट क्र. १ येथून आंचल दलाल यांची रायगडात बदली झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या डॅशिंग आयपीएस पत्नी आंचल दलाल या असून त्यांची कामगिरी दमदार आहे. महिला अधिकारी म्हणून रायगड जिल्ह्यात त्या चांगल्या काम करु शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रायगड जिल्ह्याचे विद्यमान पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे.