पत्रकार शरद जाधव यांच्या घरात चोरट्यांनी टाकला डल्ला… रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच…

0
16

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून आता वाघेश्वर नगर उडदवणे येथील विश्वमहल येथे काल रात्रीच्या सुमारास बिल्डिंगमधील पत्रकार शरद जाधव यांच्या घरात घरफोडी झाली आहे.चोरट्याने घर बंद असल्याचा फायदा घेत घराचे लॉक तोडले आणि आत प्रवेश केला..त्यानंतर कपाट फोडून सुमारे ४४ ते ४५ हजार रुपयांचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम घेऊन पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच धाटाव पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्यांनी तात्काळ पंचनामा केला असून फिंगरप्रिंट तज्ञ आणि श्वान पथकाला देखील घटनास्थळी बोलावण्यात आले आहे.दरम्यान, अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते का? चोरट्यांनी नेमकं कोणत्या मार्गाने प्रवेश केला असावा? त्यांनी किती वेळ घरात घालवला? हे सर्व तपासाअंतर्गत येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते. रोहा पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध कोनातून तपास सुरु करण्यात आला आहे.या घटनेमुळे रोहा परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे…अपार्टमेंटसारख्या सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणी चोरी होणे, हा पोलिसांसाठी मोठा आव्हानात्मक प्रश्न आहे.रोहा पोलिसांसमोर आता या चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस करत आहेत…