अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
मान्सून तळकोकणात दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अलिबाग उरण परिसरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची संततधार सुरू आहे. महाड, पोलादपूर , माणगाव, रोहा परिसरात रविवारी संध्याकाळ पासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. रोहा शहरातील दमखाडी भागात मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. ग्रामीण भागात छोटे नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक आहे. 12 तासात श्रीवर्धन मध्ये 136 तर मुरूड मध्ये 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.