रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
ताम्हिणी घाटात डोंगरवाडी गावाजवळ आज हायड्रोक्लोरिक ऍसिड नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला खाली पलटी झाला.यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲसिड गळती झाली आणि धूर देखील निघत होता. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी व पोलीस पोहचले त्यांनी खबरदारी घेऊन त्या ठिकाणी नियोजन केले.व वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम त्या ठिकाणी पोहोचली व ऍसिड गळती रोखणे, आजूबाजूचा परिसर सुरक्षित करणे आदी कार्यवाही सुरु झाली. आणि टँकर काढण्यास सुरुवात करण्यात आली.