चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वावंढळ गावच्या हद्दीत वावंढळ पुलावर रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला…अपघात झाल्यानंतर कंटेनर गाडी पुलाखाली दूरवर जाऊन कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली… राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार म्हणजेच जुना मुंबई-पुणे रस्त्यावर वावंढळ हद्दीत वावंढळ पुलावर रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास MH46/BU/2197 हा लोखंडी क्वाईल माल भरलेला कंटेनर पनवेल दिशेकडे जाताना एका गाडीला धडकला…जोरदार धडकेने तो पुलावरून कोसळून दूरवर जाऊन पडला,यात एकाचा मृत्यू झाला असून गाडीतील दोघेजण सुखरूप आहेत.अपघाताची खबर मिळताच अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर यांनी पोलीस यंत्रणा आणि अपघातग्रस्त ठिकाणच्या लोकांना संपर्क साधला आणि स्वतः आपल्या टीम सह दाखल झाले. चौकचे स.पोलीस निरीक्षक संतोष औटी देखील घटनास्थळी दाखल झाले.भयाण अंधारात शोधकार्य सुरू झाल्यावर कंटेनरपासून दूर अंतरावर एक व्यक्ती मृत अवस्थेत सापडला… कंटेनर अगदी उताणा पडल्याने कंटेनर खाली आणि लोखंडी क्वाईल खाली कोण आहे का? याचा शोध बॅटरीच्या उजेडात सुरू झाला पण काही आढळले नाही. अपघात ग्रस्त कार रात्रीत बाजूला करण्यात आली आहे. सकाळी स्थानिक पत्रकार अर्जुन कदम व केतन कदम यांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता ज्या ठिकाणी मृत व्यक्ती सापडली त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले असून त्यावर रामचंद्र बर्मा असे नाव असून वडाळा मुंबई असा पत्ता आहे.या पुलावर वारंवार अपघात होत आहेत.यात अनेकांचे जीव गेले असून याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष नाही.