चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील मशिदींचे ट्रस्टी,गावचे कारभारी,शांतता मोहल्ला कमिटी सदस्य यांची व तालुक्यातील हिंदू संघटनांची वेगवेगळी बैठक आयोजित करून शांतता व सुव्यवस्था संदर्भात सूचना केल्या.
यावेळी मोहल्ला कमिटी बैठकीत बकरी ईद कालावधीत गोवंश हत्या,जनावर चोरी,गोवंश मांस विक्री यासारखे प्रकार होणार नाहीत,नमाज पठण वेळचे योग्य ते नियोजन करून गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना,कुर्बानी वेळी गोवंश हत्या होणार नाही तसेच बोकडाची कुर्बानी झाल्यावर राहीलेले टाकाउ,मांस उघडयावर राहणार नाही याचे योग्य ते नियोजन करावे,हाळ खुर्द, मधला हाळ व हाळ बुद्रुक या तिन्ही गावांच्या प्रवेशव्दाराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाईल, त्यावेळी सहकार्य करावे. कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते गावामध्ये आल्यास कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता त्यांची माहिती पोलीस ठाण्यात त्वरित देण्यात यावी… सोशल मिडीयावर आक्षेपार्ह समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे कोणत्याही प्रकारचा संदेश, मजकुर, चित्रफिती, बॅनर, पोस्टर प्रसारीत होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी… यावेळी हिंदू संघटना व मोहल्ला कमिटी सदस्य उपस्थित होते.