पुरुष वैद्यकीय विभागातील शौचालय बांधकाम अभावी बंद… जिल्हा रुग्णालयातील रुग्णासहित नातेवाईकांची गैरसोय…

0
9

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

स्वच्छता अभियानाचा प्रचार देशभरात सुरू असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा शासकीय सार्वजनिक रुग्णालयातील पुरुष वैद्यकीय विभागात असणारे एकमेव स्वच्छतागृह नऊ महिन्यांपासून बंद आहे.त्यामुळे या विभागात दाखल असणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर यांच्यावर समोर असणाऱ्या महिला वैद्यकीय कक्ष आणि महिला शस्त्रक्रिया व लहान मुलांच्या कक्ष दरम्यान या असणाऱ्या विभागातील स्वच्छतागृहाचा वापर करण्याची वेळ आली असून विशेष म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या दोन्ही शौचालयाच्या दरवाज्यावर फक्त पुरुषासाठी असे नमूद करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात असणाऱ्या पुरुष वैद्यकीय विभागात असणारे शौचालय हे जवळपास नऊ महिन्यांपासून नूतन बांधकाम अभावी बंद असल्याने या विभागातील रुग्णासहित नातेवाईक यांची गैरसोय होत असल्याने सदर शौचालय हे त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आरोग्य व आपत्ती समितीचे जिल्हाकार्यकरिणी सदस्य तथा अलिबाग तालुका शहर प्रमुख सागर पेरेकर यांनी केली आहे.
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील पुरुष वैद्यकीय विभागात असणाऱ्या शौचालय याचे नव्याने बांधकाम करण्याचे काम नोव्हेंबर २०२४पासून हाती घेण्यात आले आहे. मात्र आजपर्यंत या शौचालयाचे काम काही पूर्ण झालेले नसून या ठिकाणी या विभागातील अनावश्यक वस्तू टाकण्यात आल्या आहेत.या ठिकाणी दोन शौचालय आणि एक स्वच्छतागृहे अशी व्यवस्था येथे आहे, पण तयेथील बांधकाम अपूर्ण असल्याने बंद करून ठेवली आहेत आणि जी सुरू तर फारच भयंकर आहे. त्याच प्रमाणे येथे येणाऱ्या दुर्गंधी नित्याचीच झाली असून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांना याचा सामना करावा लागतो.काही महिन्यापूर्वी रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण तसेच नातेवाईक यांच्या पिण्यासाठी ठेवण्यात आलेल्या फ्लिटर वॉटर कुलर मध्ये गाळ तसेच छोट्या छोट्या अळ्या मिळून आल्या होत्या.