आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज… खालापूर तालुक्यातील तिन्ही हाळ गावात पोलिसांचा रूट मार्च…

0
22

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

खालापूर पोलीस स्टेशन हद्दीतील तिन्ही हाळ गावात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च घेण्यात आला.आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, खालापूर पोलीस यंत्रणा सज्ज असून महड फाटा,जामा मस्जिद, हाळ खुर्द गाव,हूसेनिया मस्जिद,ग्रामपंचायत कार्यालय ते अंजारून फाटा असा रूट मार्च केल्यावर मधला हाळ फाटा,जामा मस्जिद,मधला हाळ गाव ते हाळ फाटा असा रूट मार्च करून तिसरा हाळ कॅफे सागर हॉटेल,मिळत नगर,बौद्धवाडी, बुद्रुक जामा मस्जिद ते हाळ बुद्रुक फाटा असा रूट मार्च करण्यात आला. खालापूर पोलीस ठाणे हद्दीत आगामी सण बकरी ईद अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आलेला असून काही दिवसांपूर्वी येथे अनुचित प्रकार घडत असल्याची माहिती मिळाली होती, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्यामुळे पुढील अनर्थ टळला होता.यावेळी ग्रामस्थानी सहकार्य केले.पोलिस निरीक्षक खालापूर सचिन पवार,RCP वडखळ व खालापूर पोलिस ठाणे कडील ४ अधिकारी व १७ अंमलदार हजर होते.