चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम ):-
ईदचे पावित्र्य राखून ईद साजरी करा, ज्यामुळे समाजात भाई चारा वाढेल,जातीय सलोखा राखण्यास मदत होईल असे आवाहन अल्पसंख्यांख विभागाचे खालापूर तालुका अध्यक्ष शरीफ शे.भालदार यांनी केले आहे.
शनिवारी ७ जून रोजी बकरी ईद असून ती देशभर साजरी करण्यात येणार आहे, आपल्या खालापूर तालुक्यात बकरी ईद अतिशय शांतता, जातीय सलोखा आणि भाई चारा निर्माण करण्यासाठी शरीफ भालदार यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले असून खालापूर तालुक्यातील तुपगाव, तिन्ही हाळ,सांगडा, खोपोली,शिळफाटा, आजीवली येथील मशिदीत जाऊन मौलवी साहेब यांना पत्र दिले असून उद्या शुक्रवारी जुम्मा असून नमाज पठणा नंतर मुस्लिम समाजात जनजागृती करण्यात येणार आहे.मज्जिद मध्य जाऊन त्यांनी मौलवी साहेब यांना पत्राचे वाटप केले.आपण सर्व बांधव शनिवारी बकरी ईदचा सण साजरा करत आहोत. तुम्हाला भेटण्याचा एकमेव उद्देश म्हणजे आपण सर्वजण (हिंदू मुस्लिम बांधव) एकत्र ईदचा सण साजरा करू असे आवाहन केले. कोणताही धर्म दुखावला जाऊ नये आणि हिंदू मुस्लिम बंधुता टिकवून ठेवूया, गोवंश कुर्बानी देऊ नये.
ईदच्या नमाजानंतर, एक खड्डा खणून त्यात बळीचे टाकाऊ भाग टाकून ते व्यवस्थित बंद करण्याचे आवाहन केले,आजूबाजूला राहणाऱ्या इतर समुदायाच्या लोकांना त्रास,दुखापत होणार नाही.काही समस्या उद्भवली तर ताबडतोब पोलीस ठाण्यात माहिती द्यावी,कुणीही कायदा हातात घेऊ नये,असे करून बंधुभावाने ईद साजरी करू असे आवाहन करून ईद च्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी उप विभागीय पोलीस अधिकारी खालापूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खालापूर आणि तहसीलदार खालापूर यांना आवाहनाची प्रत दिली.