पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
पेण शहरातील देव आळी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांवर चांगलाच हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले आहे…यात एका पुरुषाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत तर महिलेच्या पायाचे लचके तोडल्याने महिला जखमी झाली आहे. इतरही अनेक जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.सर्व जखमींवर पेण उप जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून “रोज मरे त्याला कोण रडे” अशी अवस्था पेणच्या नागरिकांची झाली आहे…
मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहेत. नगरपालिकेने तसेच लोक प्रतिनिधींनी पेण शहरासह तालुक्यात वाढत जाणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येबाबत लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी मागणी पेणकर करत आहेत.