रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगडच्या रोहा कुंडलिका नदी संवर्धन रोहा येथे रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कुंडलिका नदी संवर्धन येथे रोहा नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे काही दिवसा अगोदरच लोकार्पण झाले होते.त्याच ठिकाणी किल्ले रायगड, शिवनेरी, प्रतापगड व सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या हुबेहूब प्रतिकृती साकारलेले रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचे रायगडच्या रोहा या ठिकाणी लोकार्पण खा. सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात रोहा नगरी दुमदुमली.यावेळेस हजारो शिवप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते.