धक्कादायक…बाप आहे की हैवान !… हैवान बापानेच १ वर्षाच्या मुलीला फरशीवर आपटून मारले…

0
12

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-

वडखळ पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या पाबळ येथील देवमाळ ठाकूरवाडी येथे राहणाऱ्या १ वर्षाच्या मुलीला बापानेच रागाच्या भरात घरातील फरशीवर आपटून मारल्याची खळबळ जनक घटना घडली आहे… आरोपी बापाला वडखळ पोलिसांनी अटक केली आहे… तर आरोपीला ६ तारखेपर्यंत अलिबाग येथील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार देवमाळ ठाकूरवाडी येथे राहणारा आरोपी सुरेश पद्या दोरे वय ४० वर्षे हा रागीट स्वभावाचा असल्याने त्याचे कोणाबरोबर पटत नव्हते तर त्याच्या दोन बायका ही त्याला सोडून गेल्या होत्या तर त्याची तिसरी बायको ही दिड महिन्यापासून त्याला सोडून गेली होती.

तेव्हापासून त्याच्याकडे ४ मुले राहत होती…यातील १ वर्षाच्या मुलीला (मृत विजया उर्फ बेबी) आरोपी बापाने (सुरेश दोरे याने) फरशीवर आपटून मारल्याची घटना तारिक १ जून रोजी घडली असून वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सदर घटनेचा अधिक तपास वडखळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस करण्यात येत आहे.