रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
दिनांक 8 आणि 9 जुन रोजी किल्ले रायगडावर तीथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा होत असून या पार्श्वभुमीवर सोहळ्याचे स्वागताध्यक्ष, मंत्री भरत गोगावले यांनी किल्ले रायगडावरील नियोजनाची पहाणी केली.यावेळी होळीचा माळ, ZP विश्राम गृह, राजसदर येथे भेट देत प्रशासनाचे अधिकारी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा करीत शिवप्रेमींची गैरसोय होणार नाही याबाबत सूचना केल्या.9 जून रोजी मुख्य सोहळ्याला सदर सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा ही प्रस्थावीत आहे.