कांदा मुळा भाजी,अवघी विठाई माझी!विश्वरूप प्रतिष्ठानमार्फत पर्यावरण दिनानिमित्त बियाणे वाटप…

0
12

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून रोजी महाड आणि रोहा तालुक्यातील शेकडो महिलांना बियाणे वाटप करण्यात आले… महिलांनी या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला…आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रोहिणी सतीश धारप यांचे आभार मानले…

विश्वरुप प्रतिष्ठान ही रायगड जिल्ह्यातील विविध सेवाभावी उपक्रम राबवणारी सामाजिक संस्था आहे.संस्थेच्या विविध उपक्रमांपैकी एक म्हणजे वृक्षारोपण. गेल्या वर्षी जिल्ह्याच्या खारफुटीने नापीक झालेल्या जमिनीवर नारळ लागवड करून संस्थेने शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला होता. याच कडीमध्ये यावर्षी महाड येथील दादली आणि करंजखोल या गावांमध्ये 40 महिलांना तसेच रोहा तालुक्यातील देवकान्हे गावाच्या पंचक्रोशीतील 70 महिलांना यामध्ये परसबी, भेंडी, गवार मिरची, टोमॅटो अशा प्रकारची बियाणे वाटण्यात आले.अशाप्रकारे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ही संत शिकवण अनुसरून  विश्वरूप प्रतिष्ठान मार्फत 110 महिलांना पावसाळी भाज्यांच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा   रोहिणी सतीश धारप यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर मीनल बुटाला यांनी महिलांना भाजीपाला लागवडीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी  वसंत शेडगे  आणि डॉ. मंजुषा कुद्रीमोती यांनीही उपस्थित राहुन उपस्थितांना मार्गदर्शन केले…