रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोहा आगार (एस.टी. डेपो) आणि रोहा चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०५ जून रोजी सकाळी ११ वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन डेपो आवारात करण्यात आले. या उपक्रमात मान्यवर व्यक्ती, उन्हाळी शिबिरातील बालकं आणि स्थानिक पर्यावरणप्रेमी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. वृक्षारोपण सुरु असतानाच परिसरात सतत कोकिळेचा मधुर स्वर घुमत होता. या निसर्गसंगीताने वातावरण भारावून गेले होते. विशेष म्हणजे, कोकिळांवर प्रेम करणारे रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवल स्वतः त्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध झाले. बालकांचा उत्साही सहभाग, आल्हाददायक गार वारा आणि कोकिळेचे सुमधुर सूर या तिन्ही घटकांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी यांना हा क्षण एक अविस्मरणीय आणि जादुई अनुभव ठरला.
या कार्यक्रमात प्रांत साहेब ज्ञानेश्वर खुटवल, डीएफओ शैलेंद्र कुमार जाधव, तहसीलदार किशोर देशमुख, डेप्युटी इंजिनियर व्ही. आर. बागुल, शाखा अभियंता ए. एम. पाटील, ज्युनियर शाखा अभियंता एम. एम. घाडगे आणि वनपाल डी. बी. वाघे यांच्यासह रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार, स्थानक प्रमुख अजिंक्य रोहेकर, आगार लेखाकार विकास खाडे, वरिष्ठ लिपिक प्रियंका चव्हाण, वाहतूक नियंत्रक हेमंत कदम, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक स्वप्निल पवार, वाहतूक नियंत्रक नेथू गावित आणि छाया घोरपडे उपस्थित होते. एसडीओ यांनी शिबिरातील मुलांना निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देताना, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक असल्याचा संदेश दिला. त्यांनी उपस्थितांना वृक्षारोपणासोबतच निसर्गाच्या सौंदर्याचे, सूरांचे व शांततेचे जतन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम केवळ झाडांचे नव्हे,तर पर्यावरणप्रेमाच्या भावनांचेही रोपण करणारा ठरला, ज्यामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि निसर्गप्रेमाची वृत्ती वाढेल, असे आयोजकांनी आशा व्यक्त केली. दरम्यानाचा काळात ज्ञानेश्वर खुटवल माध्यमांशी बोलताना म्हणाले की…….