ड्रायव्हिंग करताना कट मारण्यावरून दोन गटात हाणामारी… दोन गटातील हाणामारी प्रकरणी मांडवा पोलिस ठाण्यात तक्रार…

0
14

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत रायगड जिल्ह्यातील मांडवा रो रो जेट्टी येथील मेनगेटजवळ दोन मोटार सायकलवरून आलेले चार इसम यांच्या गाडीस ड्राइविंग करताना कट मारण्यावरून दोन गटात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली असून यामध्ये मृणाल अनिल म्हात्रे (वय 27 ड्रायवर राह कोळगाव,) सुहास सुभाष पाटील (37 राह कवाडे सुरक्षा रक्षक),नितेश अनिकेत कोळी( वय 26 वर्षे बोंडणी), योगीराज मनोज कोळी (24 वर्षे बोंडणी )सुरेंद्र म्हात्रे,प्रितेश भगत, अतिश म्हात्रे( सर्व रा. कोळगाव ता. अलिबाग जि. रायगड) असे जण जखमी झाले आहेत… दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी मांडवा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत…

याबाबत सविस्तर माहिती अशी की,मृणाल अनिल म्हात्रे (वय २५, वर्षे व्यवसाय टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, रा. कोळगांव, ता. अलिबाग, जि.रायगड)यांनी दिलेल्या माहितीनुसार अलिबाग तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेल्या मांडवा रो रो जेट्टी येथील मेनगेटजवळ मृणाल म्हात्रे व त्याचे सहकारी यांना नितेश कोळी, योगिराज कोळी, आर्यन, प्रियेश, आदर्श, प्रज्वल , रोशन ,इतर ४० ते ४५ अनोळखी इसम( सर्व रा.बोडणी पो.सारळ ता. अलिबाग)यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन लोखंडी रॉड, लाकडी काटया तसेच हाताबुक्यांनी व लाथांनी मारहाण करुन दमदाटी केली व या मध्ये मृणाल अनिल म्हात्रे व  सुरेंद्र म्हात्रे,प्रितेश भगत, अतिश म्हात्रे (सर्व रा. कोळगाव ता. अलिबाग जि. रायगड) यांचे आंगावर दगडे मारुन दुखापत केली तसेच रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचेकडील  जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी मांडवा पोलिस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं. मांडवा सागरी पोलीस ठाणे गु.र.नं.७३/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम १८९(२),१८१ (४), १९०,१९१(२), ૧૧૧(૨), ૧૧૮(૧), ૧૧૧(૨), ૧૨૧(૩૪), રૂ૧૧(૨)(૨), मु.पो.अधि. कलम ३७ (१) (३) प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.

तर योगीराज मनोज कोळी (वय २२, वर्षेव्यवसाय- मच्छीमारी रा. बोडणी कोळी वाडा, ता.अलिबाग,जि. रायगड) यांनी दिलेल्या माहितीनुसार मृणाल अनिल म्हात्रे,अतिश अशोक म्हात्रे,इतर ५ ते ६ अनोळखी इसम (सर्व राहणार रा. कोळगा ता. अलिबाग जि. रायगड.)यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन मृणाल म्हात्रे यांनी योगीराज कोळी यांना शिवीगाळ करुन योगीराजच्या उजव्या खांदयावर व छातीवर जोरात फाईट मारुन दुखापत करुन साक्षीदार नितेश कोळी व आदर्श कोळी यांना अतिश म्हात्रे  व मृणाल म्हात्रे व अनोळखी इसम यांनी लाकडी रिपेने तसेच अतिश म्हात्रे व इतर ७ जणांनी योगीराज यांच्या दोन सहकाऱ्यांना यांना हाताबुक्यांनी व लाथांनी माराहण करुन शिवीगाळी व दमदाटी केली व मृणाल म्हात्रे याने योगीराज यांची कॉलर पकडुन मारहाण करीत असताना योगीराज यांच्या गळयात असलेली सोन्याची चैन तुटून नुकसान झाले म्हणुन तसेच जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.दोन्ही गटातील जखमीवर अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे…