महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड तालुक्यातील बिरवाडी टाकीकोंड येथे राहणाऱ्या तानाजी रामचंद्र जाधव (वय 45) यांचा विंचूदंशामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे.तीन दिवसांपूर्वी तानाजी जाधव यांना विंचू चावला होता. मात्र त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. सुरुवातीला किरकोळ समजून त्यांनी बिरवाडी येथील स्थानिक पाटील डॉक्टरांकडे उपचार घेतले.आज अचानक तब्येत बिघडल्याने व उलट्या सुरू झाल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे बिरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष नटे अधिक तपास करत आहेत.