कर्जत- मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील कशेळा भागात खड्ड्यांचे साम्राज्य… मात्र एमएससीआरडीए विभाग निद्र अवस्थेत का?

0
24

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाचे एमएससीआरडीए विभागाच्या माध्यमातून सिमेंट कॉक्रिटी करणाचे काम करण्यात आले आहे. तर कशेळा कळंब आदि भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डयांचे साम्राज्याचे वास्तव पुढे येत असल्याने ठेका प्राप्त ठेकेदाराकडून काम हे निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे तसेच या पडलेल्या खड्डयांमुळे होणारे आपघात व वाहानचालकाना जीव मुठ्ठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने, हे खड्डे बुजवण्यासाठी एम एस सी आर डी ए विभागांनी निद्र अवस्थेत का? असा प्रश्न मात्र सामान्य नागरिक व वाहानचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
कर्जत – मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्याच्या मध्यभागी भलेमोठे खड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्यातून वाट चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.यासह या रस्त्यावर मध्यमागी पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होऊन वित्तहानी व जीवीतहानीच्या घटना देखील घडल्या आहेत. कशेळे कर्जत मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावरून वाहतुकीसाठी ग्रामीण भागातील अनेक गावांचा नित्याचा संपर्क आहे. तसेच हा रस्ता व्यवसायिक अवजड वाहनांना महामार्गाशी जोडण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे. त्यामळे सदर रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुसाट सुरु असते. रस्त्यावर मध्यमागी पडलेल्या भल्यामोठ्या खड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र याबाबत एमएसआरडी यांचा पुरता दुर्लक्ष तर संबधित प्रशासन गाढ झोपेत असल्याचे चित्र समोर येत होते. दरम्यान या मार्गावरील खड्डे चुकवताना मोठा अपघात झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार  एम एस आर डी ए  विभाग राहणार असल्याच्या प्रतिक्रिया देखील या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमधून उमटत होत्या. कर्जत कशेळे मुरबाड रस्त्यावरील खड्डे भरून वाहन चालकांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी देखील येथील नागरीकांमधून जोर धरु लागल्या होत्या. कर्जत मुरबाड रस्त्यावरील वंजारवाडी येथील खड्डे एम एस आर डी ए  विभागाकडून भरण्यात आले आहेत. मात्र कशेळे बाजार पेठ परिसर, कळंब आदि भागांमध्ये असलेले खड्डयांचे साम्राज्य जैसे थे असल्याने, हे खड्डे बुजवून वाहन चालकांना दिलासा द्यावा जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर होईल तसेच खड्डे भरून मोठ्या अपघाताची घटना घडण्यापासूनचा अनर्थ टाळावा असे वाहन चालकांकडून तसेच नागरीकांना कडून बोलले जात असल्याच्या बातम्या देखील काही दैनिक वृत्तपत्रामधून प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र पडलेले खड्डे जैसे थे या स्थितीत असल्याने एम एस आर डी ए  विभागाकडून कोणती दखल न घेतल्याचे चित्र समोर येत असल्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी एम एस सी आर डी ए विभागांनी निद्र अवस्थेत का? असा प्रश्न मात्र सामान्य नागरिक व वाहानचालकांकडून उपस्थित केला जात आहे.