म्हसळा शिवसत्ता टाइम्स (वैभव कळस ):-
सालाबादप्रमाणे याही वर्षी म्हसळा तालुक्यात सर्वत्र वटपौर्णिमा उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. सात जन्मी हाच नवरा मिळावा आणि जन्मोजन्मीचे नाते अतूट रहावे म्हणून वडाच्या झाडाला धाग्याने गुंफून आणि पाच प्रकारच्या फळांचा नैवेद्य दाखवून परमेश्वराला हे नाते अतूट आणि दृढ व्हावे अशी प्रार्थना सर्व स्त्रिया करीत होत्या. आजच्या वटपौर्णिमेचे विशेष महत्व म्हणजे तालुक्यातील माजी सभापती महादेव पाटील आणि सकलप ग्रामस्थ यांच्या विशेष प्रयत्नातून बांधण्यात आलेला पार याची सुरुवातही आजच्या पवित्र दिवशी झाली.
त्यामुळे अतिशय सुंदर आणि चांगल्या दर्जाचे बांधण्यात आलेल्या पारावरील वडाच्या झाडाला पूजण्याचे भाग्य अनेक स्त्रियांना घेण्यात आले. पिंपळ आणि वड ही वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्याला अत्यंत लाभदायक असून अश्या वृक्षांचे जतन होणे अत्यावश्यक असल्याचे महादेव पाटील यांनी सांगितले…