अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या प्रवेशद्वारावर आणि काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते,ज्यामुळे नागरिकांची आणि वाहनचालकांची गैरसोय होत होती. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी देखील होत होती.शिवसत्ता टाइम्सने यावर वारंवार बातमी प्रसिद्ध केली होती…ज्यामध्ये नागरिकांचा संताप व्यक्त करण्यात आला होता…अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक यांनी वारंवार प्रशासनाला निवेदन केले होते… मात्र प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे…प्रशांत नाईक यांनी स्वतःच्या खर्चाने रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरु केले आहे…
या खड्ड्यांकडे जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष का देत नाही,असा आरोप नागरिक करीत आहे…या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अलिबागच्या काही तरुणांनी अनोखी शक्कल देखील लढवली.त्यांनी खड्ड्यात वटवृक्षाचे रोपण करून अनोखी वटपौर्णिमा साजरी केली.या अनोख्या आंदोलनाने जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत आहेत का ?…विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी याच रस्त्यावरून ये-जा करतात…ते फक्त खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करतात. काही दिवसांनी रस्ता पुन्हा उखडून खड्डे पडतात…मात्र प्रशासन नागरिकांच्या मागण्यांकडे केराची टोपली दाखवत आहेत…अलिबागच्या नागरिकांनी प्रशासनाच्या ढिलाई कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे…रस्त्याच्या खड्ड्यात पडून एखाद्याचा अपघात झाला तर याला जबाबदार प्रशासन राहणार का ? असे प्रश्न अलिबागकर करीत आहेत..
रस्त्याची डागडुजी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे…या कामामुळे नागरिक व वाहनचालक खूप आनंदी आहेत…लवकरच चांगल्या रस्त्याचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. खड्डे बुजवून रस्ता सुधारल्यास वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सोपा होईल,तसेच लवकरच चांगल्या रस्त्याचा अनुभव मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय…तसेच नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी रस्त्याचे काम स्वखर्चातून चालू केल्याने अलिबागकरांकडून त्यांचे कौतुक होत आहेत…