रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष शिगेला… पालकमंत्री पदावर शिवसेना शिंदे गटाचा दावा…

0
8

माणगावशिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :- 

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष चिघळत चालला आहे…  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आक्षेप घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पालकमंत्री पदावर शिवसेना शिंदे गटाचाच हक्क आहे… या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यात शिवसेनेतर्फे मंगळवार दि. 10 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली… या परिषदेत युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, माणगाव तालुका प्रमुख ॲड. महेंद्र मानकर आणि इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली… ॲड. महेंद्र मानकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगितले…. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे, त्यामुळे पालकमंत्रीपदाचा खरा हक्क शिवसेनेचाच आहे… राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितीन पवार व प्रताप घोसाळकर यांनीही राष्ट्रवादीवर सडकून टीका केली….          आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना युतीला विजय मिळेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले… या पत्रकार परिषदेला शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख राजेश कदम, ॲड.  सुशील दसवते, लोणरेचे माजी सरपंच रविंद्र टेंबे, जगदीश दोशी, समाधान करकरे, निलेश केसारकर, दाऊद मापकर, संतोष पोळेकर, रोहित रातवडकर, अजित खेडेकर, प्रफुल्ल खरंगे, दाऊद मापकर, सचिन शिवगण आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….