रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे):-
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गोवे, मूठवली ते शिरवली दोन महिन्यांपूर्वी बनवण्यात आलेल्या नवीन रस्त्याचे तिनतेरा वाजले असून बनविण्यात आलेला रस्ता पूर्णपणे खचला आहे…रस्त्याच्या साईड पट्ट्या ही निकृष्ट दर्जाच्या बनविण्यात आल्या आहेत…तसेच मुंबई-गोवा हायवेमधील गोवे गावाकडे जाणारा रस्ता ही चिखलात गेला आहे.यामुळे प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत ४ कोटी ५८ लाख ४० हजार रुपयांचा निधी खर्च करून गोवे ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई गोवा हायवे पासून गोवे,मुठवली ते शिरवली मार्गी खांब मुंबई गोवा हायवे पर्यंत ५०० किलोमीटर रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले.परंतु बनविण्यात आलेल्या रस्त्याचे काम, साईड पट्ट्यांचे काम, तसेच मोऱ्यांचे काम निस्कृष्ठ दर्जाचे असल्याचे एकंदरीत परिस्थिती वरून दिसून येत आहे.यामुळे या मार्गानी प्रवास करणारे विद्यार्थी वर्ग, प्रवाशी नागरिक यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे…यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया गोवे ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजना ही ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी आणि आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना असुन यामुळे ग्रामीण भागातील चांगले रस्ते बाजारपेठेला जोडले जातात…यामुळे उत्पादनाची विक्री करणे सोपे जाते.लोकांना शिक्षण,आरोग्य सेवा व इतर सामाजिक सुविधा मिळण्यासाठी मदत होते.लोक चांगले जिवनमान जगू शकतात.
चांगले व रुंद रस्ते व्हावे यासाठी गोवे येथील शेतकऱ्यांनी विनामूल्य भात शेतीची जागा रस्त्यासाठी दिली.शिवाय शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला असणारी असंख्य हापूस आंब्याची झाडे तोडण्यात आली.एवढेच नव्हे तर चांगल्या रस्त्यासाठी फार्म हाऊस वाल्यांनी ही मोफत जागा दिली.परंतु ठेकेदारांनी मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्यामुळे याचा नाहक त्रास ग्रामस्थांना भोगावा लागणार आहे…