चौक, शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या मराठवाडा विभागाच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील पत्रकार राकेश खराडे यांना उत्कृष्ट पत्रकार संघटक म्हणून सन्मानित करण्यात आले….
मराठवाडा रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनामध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, एबीपी माझा वाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक, जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश संघटक संजय भोकरे यांच्याहस्ते उत्कृष्ट पत्रकार संघटक पुरस्कार रायगड जिल्ह्याला जाहिर करुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार राकेश खराडे यांना प्रदान करण्यात आला… यावेळी प्रसार माध्यमांचा डीएनए कोणता ? या विषयावरील हा परिसंवाद गाजला… या परिसंवादामध्ये सहभागी झालेले संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, नवी दिल्ली येथील पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, अॕड. महेश भोसले, माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे या विचारवंतांना बोलतं करणाऱ्या परिसंवादाच्या संवादिका अश्विनी सातव – डोके यांनी परिसंवादामधून विचारांचे मंथन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे व्यक्त केले….
या बहारदार ऐतिहासिक रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनाला आमदार संजय किणीकर, आमदार प्रदिप जयस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, संभाजीनगर मनपाचे आयुक्त जी.श्रीकांत, प.पू.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष जयदिप कवाडे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे आदी उपस्थित होते… महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून रसायनी मोहोपाडा येथील पत्रकार राकेश खराडे यांना उत्कृष्ट पत्रकार संघटक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…