अलिबाग येथील नियोजित बैठक आता उरण येथे होणार… महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा निर्णय…

0
10

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव व कोकण विभागाचे प्रभारी मा.श्री.यू.बी. वैंकटेश यांची दिनांक १९ जून २०२५ रोजी अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेली बैठक काही अपरिहार्य कारणास्तव आता उरण येथे आयोजित केली जाणार आहे… या संदर्भातील माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश पाटील यांनी अधिकृत पत्रकाद्वारे दिली आहे… बैठकीच्या स्थळात झालेल्या बदलाची माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, अलिबागऐवजी उरण येथे बैठक होणार आहे… बैठकीसाठी नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर ती सर्व संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेळेवर कळविण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले…. यासोबतच, अलिबागमध्ये सुधारित स्वरूपात पुन्हा एक बैठक आयोजित केली जाणार आहे, अशी माहितीही पत्रकात देण्यात आली आहे…. सूचना व समन्वयासाठी खालील नेत्यांना प्रत पाठविण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे… राजेश शर्मा (प्रदेश सरचिटणीस), महेंद्र घरत (अध्यक्ष, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी) आणि राजाभाऊ मधुकर ठाकूर (समन्वयक, अलिबाग, जिल्हा रायगड) या संदर्भात अधिक माहिती देताना कोकणाचे ज्येष्ठ काँग्रेस नेते, पक्षाचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आणि आदरणीय राजा मधुकर ठाकूर उर्फ ‘राजाभाऊ’ यांनी बुधवारी दिलेल्या प्रतिक्रियेत वरील गोष्टींची पुष्टी केली….