नांदगाव तालुक्यातील जनतेला खुशखबर… तीन महिन्यांचं रेशन मोफत व पूर्णपणे मिळणार…

0
8

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 21 मे रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचं रेशन धान्य महाराष्ट्रातील गरजू रेशनकार्डधारकांना मोफत व पूर्णपणे वितरित करण्यात यावं… प्रत्येक व्यक्तीसाठी 2 किलो गहू + 3 किलो तांदूळ अंत्योदय योजनेअंतर्गत 20 किलो तांदूळ + 15 किलो गहू प्रति कार्ड पूर्णतः मोफत वितरण करण्यात येणार आहे…नांदगावचे तहसीलदार सुनील सौदाने यांनी देखील या निर्णयावर शिक्कामोर्तब करत सांगितले की,कोणत्याही लाभार्थ्याच्या वाट्याचं धान्य कपात होणार नाही…सर्व नागरिकांनी वेळेत रेशन दुकानांवर जाऊन आपलं धान्य उचलावं. तसेच रेशन वेळेत उचलावे अडचण असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे…