रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर अंतर्गत 21 जून या दिवशी सकाळी 6.30 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला…योग दिनाच्या कार्यक्रमात संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. उज्ज्वला चंदनशिव यांनी उपस्थितांना अतिशय उत्तम पध्दतीने योग प्रशिक्षण दिले यामध्ये त्यांनी अनुलोम-विलोम प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम कपालभाती प्राणायाम, भ्रमारी प्राणायाम वज्रसान योग प्रकार घेऊन त्यांचे महत्व व फायदे सांगितले योगा दिनाच्या कार्यक्रमात संस्थेचे सल्लागार डॉ. नितीन गांधी,संस्थेचे आधारस्तंभ माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान,संस्थेचे सदस्य भरत तन्ना,डॉ काशिनाथ स्वामी, डॉ राकेश सिंग, डॉ राज केशरवाणी यांच्या सोबत सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.योग दिनाचे महत्त्व सांगत डॉ.गांधी यांनी योगामुळे आरोग्य उत्तम व तंदुरुस्त राहील असे सांगितले.प्रत्येक शाळेमध्ये योग शिक्षणाचा रोज एक तास असावा असे डॉ राजाराम हुलवान यांनी सांगितले. व उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.