गजर विठ्ठल नामाचा सोहळा आषाढी वारीचा … पंढरपूरला निघालेल्या वारीमध्ये आ.प्रशांत ठाकूर सहभागी…

0
7

पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला…विठ्ठलनामकाला पंढरीसी” संत निवृत्तीनाथांचा हा अभंग आपण अनेकदा ऐकला असेल.हाच वैष्णवांचा मेळा देहू,आळंदी मध्ये भरला आहे. दरवर्षी प्रमाणे आषाढी वारीला सुरवात झाली आहे.राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होत असतात. हरिनामाचा गजर करत भाविक पंढरीत दाखल होत आहेत…याच आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरला निघालेल्या वारीत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील यांनी सहभागी होत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत भाजप पनवेल तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील,पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव,अनुसूचित जाती सेल रायगड जिल्हाध्यक्ष अमित जाधव,माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा,अजय बहिरा, शिवकर सरपंच आनंद ढवळे, प्रितम म्हात्रे, रूपेश नागवेकर, स्वप्नील ठाकूर आदी उपस्थित होते.आमदार प्रशांत ठाकूर देखील वारकऱ्यांसोबत पायी चालत विठ्ठलाची भक्ती गीते गायन,नृत्य आणि टाळ नाद करत वारीचा आनंद घेत आहेत…