महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने ) :-
महाड शहरातील एका चार मजली इमारतीच्या छतावरून( टेरेसवरून) पडून २० वर्षाय तरुणीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना महाड शहरातील काकर तळे येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की रिया किशोर चौधरी वय वर्ष २०असे या तरुणीचे नाव असून महाड शहरातील काकर तळे येथील समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या चार मजली इमारतीच्या छतावरून(टेरेस वरून) ही तरुणी खाली पडली.यावेळी तिला गंभीर स्वरूपाची दुखापत झालेल्या अवस्थेत तीला महाडच्या ग्रामिण रुग्णालयात नेले असता या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (डॉक्टरांनी) तील मृत घोषित केले…
महाड शहरातील काकर तळ येथील समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून ही तरुणी कशी पडली याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. झालेली नाही तरी याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत…