सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची २९६वी पुण्यतिथी… अलिबागमध्ये विविध उपक्रमांद्वारे त्यांना विनम्र अभिवादन…

0
6

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

मराठा साम्राज्याचे महान सरखेल आणि समुद्र प्रवाहावर अधिराज्य गाजवणारे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या २९६व्या पुण्यतिथीनिमित्त आज अलिबागमध्ये विविध उपक्रमांद्वारे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक संस्थांच्यावतीने त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्थानिक शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांची सादरीकरणे केली, तर इतिहास अभ्यासकांनी आंग्रे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या रणनीती, शौर्य व योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते…त्यांनी सरखेल आंग्रे यांच्या स्मृती जपण्यासाठी युवकांनी प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श ठेवावा,असे मत व्यक्त केले…सरखेल कान्होजीराजे आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते आणि त्यांनी इंग्रज,डच व पोर्तुगीज सत्तांशी लढा देत मराठा साम्राज्याच्या सागरी सीमांचे रक्षण केले.त्यांच्या योगदानामुळे मराठा साम्राज्याच्या समुद्रावरील वर्चस्वाची पायाभरणी झाली.

यावेळी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे, अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक,माजी उपनगराध्यक्ष ऍड. मानसी म्हात्रे, ऍड. अंकित बंगेरा ,ऍड. प्रवीण ठाकूर,  कविता ठाकूर ,सुनील दामले रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे , रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले , जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, कमोडोर दीपक सिंघल(VSM) जेएसएम महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख डॉ. खान, आदी मान्यवर उपस्थित होते. या अभिवादन सोहळ्याने त्यांच्या स्मृतींना उजाळा देत स्थानिक जनतेमध्ये अभिमानाचे व श्रद्धेचे वातावरण निर्माण केले.