अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तिशी मैत्री करणं रायगड जिल्ह्यातील एका आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीला चांगलंच महागात पडलं असून सदर अल्पवयीन पीडित मुलगी ही चार महिन्याची गर्भवती असून याबाबतची फिर्याद पीडित मुलीने अलिबाग पोलिस ठाण्यात दिली असून यातील आरोपी यास अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका आदिवासी वाडीवरील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी हिची गोरखनाथ गणेश पवार (यय-१८ वर्षे रा.चाबोशी दांडवाडी खालापुर जि रायगड) याच्याबरोबर सात आठ महिन्यापूर्वी फेसबुक या सोशल मीडियामार्फत परिचय झाला होता. या परिचयाचा फायदा घेत आरोपी गोरखनाथ गणेश पवार याने पीडित अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला अलिबाग या ठिकाणी फिरण्याकरीता आणून फिर्यादी यांची सहमती नसताना देखील शारिरीक संबंध प्रस्थापीत केल्याने आरोपी यांच्या कडुन फिर्यादी हया चार महिने गरोदर राहील्याने गोरखनाथ पवार यांचे विरोधात तक्रार देण्यात आली आहे…
सदर प्रकरणातील आरोपीस अलिबाग पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलीस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुरनं.११५/२०२५ बाल लै. अत्या. संरक्षण (POCSO) अधिनियम, 2012 चे कलम ४,८, भारतीय न्याय संहिता २०२३ ६५(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सरिता मुसळे ह्या करीत आहेत. रायगड जिल्ह्यात काही दिवसापासून महिलांवरील अत्याचारांत वाढ झाल्याची दिसून येत आहे.