रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विकास मंत्री तथा श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या आमदार अदिती वरदा सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातील म्हसळा तालुक्यात आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती म्हसळा पोलिस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे.सदर बालविवाहाबाबत जिल्हा प्रशासनातील स्थानिक अधिकारी पासून वरिष्ठ अधिकारी, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी यांना खबर नाही हे विशेष.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,म्हसळा तालुक्यातील आदिवासी वाडी कोळे येथे अल्पवयीन मुलीचा विवाह म्हसळा तालुक्यातील आदिवासी समाजातील राजेश पवार (वय १९ वर्षे) यांच्याबरोबर लावून दिल्याची घटना सोमवार दिनांक २ जून रोजी २०२५ रोजी घडली आहे.
अल्पवयीन मुलगी ही केवळ १४ वर्ष ६ महीन्याची असून ती गर्भावती आहे. आरोग्य विभागातील आशा सेविकांच्या रुटीन चेक अपमुळे पिडीत मुलीने तिच्या अडचणी सांगितल्याने हा प्रकार आरोग्य विभागाच्या लक्षांत आला.आणि संबंधीत मुलानी सोमवार दि. २ जून रोजी एकमेकांच्या गळ्यांत वर माला आणि मुलानी पिडीत मुलीच्या गळ्यांत मंगळसूत्र घातल्याचे सूत्रांनी सांगितले. आशा सेविकेच्या माध्यमातून सदर पीडीत मुलीची तपासणी आणि पिडीत बाधीत आसल्याची खात्री करण्यात आल्यानंतर ग्रामसेवक व आरोग्य विभागाने कर्तव्याचे पालन सुरु केले.बालकांच्या हितासाठी लैंगिक छळापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायदा करण्यात आला असताना महिला व बालविकास विभागाने केलेल्या दुलक्षाचा विषय चर्चेत असून संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
याबाबत तळवडे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मनिषा लोंढे यानी दिलेल्या फिर्यादी नुसार म्हसळा पोलीसानी गुन्हा रजी. नं. ४०/२०२५ भारतीय न्याय संहीता २० २३ चे कलम ६४(२)( ए च )( एम ) ६५ प्रमाणे सह बालकांचे लैंगिक अपराधा प्रमाणे संरक्षण अधिनियम २o१२ चे कलम ४,६,८, १२ प्रमाणे गुन्हा नोंदविला असून २० वर्षाचे नवरदेव आरोपी राजेश पवार यास पोलीसानी ताब्यात घेतले आहे.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघातील तळा आणि म्हसळा तालुक्यासहित अलिबाग पोलिस ठाण्यात बालकाचे लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गेल्या अठरा महिन्यात रायगड जिल्ह्यातील 380 हून अधिक महिला अल्प वयीन मुलींवर विनय भंग तसेच अत्याचार याच्या घटना घडलेल्या आहेत.या होणाऱ्या घटनांकडे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे गांभीर्याने लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होत आहे.
बालविकास प्रकल्पाधिकारी म्हसळा यानी अल्पवयात विवाह केल्याने काय परिणाम होतात याबद्दलची माहिती मुलीच्या नातलगाना देणे कर्तव्य भावनेतून आवश्यक होते परंतु प्रभारी प्रकल्पाधिकारी यानी कर्तव्यात कसूर केल्याने अल्पवयीन मुलीचे प्रथम शारीरीक संबध, नंतर विवाह आणि आता कुपोषणापर्यंतच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
बालविकास प्रकल्पाधिकारी म्हसळा हे पद गेले ३ वर्ष ८ महीने रिक्त असून पर्यवेक्षिकाला या पदाचा कार्यभार दिल्याने यांचा हा चर्चेचा विषय झाला आहे. ऐन अधिवेशन सुरु असताना तोंडावर ही घटना घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.