जिओ टॅगींग प्रणालीला स्थगिती देत देयक अदा करण्याची ठेकेदारांची माहिती…

0
8

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद मार्फत करण्यात आलेल्या कामाचे देयक हे जिओ टॅगींग प्रणालीमुळे अडकुन पडले आहे… जिओ टॅगींग प्रणालीला काही महिने स्थगीती देत ठेकरेदार यांची देयके अदा करण्यात यावी, यासंदर्भात रायगड जिल्हा परिषद ठेकेदार युनियनने रायगड जिल्हा परिषद (कुंटे बाग) येथे निदर्शने करीत देयकाची मागणी केली आहे….
महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद मार्फत करण्यात येणाऱ्या कामाचे अक्षांश आणि रेखांश दर्शवणारे भौगोलिक निर्देशक वापरून त्या जागेची ओळख निश्चित करणे, याचा उपयोग विविध शासकीय कामांमध्ये माहितीचे व्यवस्थापन, योजनांची अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी जीओ टॅग प्रणालीचा शासन आदेश काढला आहे…. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये ‘जिओ टॅगिंग’ चा वापर अनिवार्य करण्यात आलेला असून, शासनाच्या परिपत्रकांनुसार, ‘जिओ टॅगिंग’ चा वापर करून माहितीचे संकलन आणि व्यवस्थापन केले जात आहे…. जिओ टॅगिंगमुळे कामाच्या ठिकाणी उपस्थिती आणि कामाची प्रगती यांचा अचूक तपशील मिळतो…. त्यामुळे कामांमध्ये होणारे गैरप्रकार आणि अनियमितता कमी होते… जिओ टॅगिंगमुळे कामांमध्ये होणारे गैरप्रकार जसे की बनावट बिले सादर करणे किंवा कामाची चुकीची माहिती देणे, इत्यादींवर नियंत्रण ठेवता येत असल्याने जीओ टॅग प्रणालीचा शासन आदेश काढला आहे…
मात्र रायगड जिल्ह्यातील ठेकेदारांना बिल तयार करताना या प्रणालीचा त्रास होत असल्याकारणाने रायगड जिल्हा परिषद ठेकेदार युनियनने जिल्हा परिषद कार्यालयाकडे २४/०६/२०२५ रोजी पत्र याबाबत दाखल केले होते…. परंतू आजतागायत जिल्हा परिषद कडून अथवा महाराष्ट्र शासनाकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही…
त्याचप्रमाणे शासन लावलेल्या प्रणाली रायगड जिल्हा हा दुर्गम भागामध्ये असल्यामुळे वर लावलेली प्रणाली ही करणे शक्य होत नाही….  तरी जिओ टॅगींग ही शासन प्रणाली पुढील काही महिन्याकरीता स्थगिती देऊन ठेकेदारांना बिल अदा करावी याकरीता रायगड जिल्हा परिषद ठेकेदार युनियनने पुन्हा एकदा स्मरणपत्र दिले आहे…..