धाटाव एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्याने दूषित सांडपाणी शेतीत… शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ…

0
6

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रोहा तालुक्यातील खारगाव येथील गरीब शेतकऱ्याच्या शेतजमिनीत एमआयडीसी दूषित पाणी शिरल्याने शेती नापीक झाली असून आता पिकवायचं काय आणि खायचं काय हा प्रश्न शेतकऱ्याला पडला असून सदर प्रकरणाने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे…

धाटाव एमआयडीसीची दूषित पाईपलाईन ही खारगाव हद्दीमधून जाते…येथे शेतकरी भारती  मलेकर,पंकज मलेकर हे दोन्ही मायलेक आपल्या पूर्वपरांगत असलेली शेती करीत असतात त्यांना बाकी उपजीविकेचे साधन नाही यावर्षी शेतीची मशागत करून लावणीच्या कामाची लगबग सुरू असताना त्यांच्या शेतात दूषित पाण्याची पाईपलाईन फुटून केमिकल युक्त पाणी शेतीत घुसले त्यामुळे शेतीचे खूप नुकसान होऊन शेती नापीक झाली आहे…

दरवर्षी हा प्रकार सुरू असून संबंधित शेतकरी यांनी वारंवार एमआयडीसी अधिकारी यांच्याशी संपर्क साधत शेतीचे नुकसान होत असल्याची पूर्वकल्पना दिली होती…परंतु अधिकारी यांनी नेहमीच दुर्लक्ष केली…त्यामुळे धनदांगड्यांच्य कंपन्याकरिता एमआयडीसी अधिकारी गरीब शेतकऱ्यावर अन्याय करीत असल्याचा या प्रकरणात वरून दिसून येत आहे…

मोदी सरकारच्या काळात सर्व काही अलबेल आहे…चित्र दाखवले जात असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे…हे खारगाव येथील बाधित शेतकऱ्यांच्या प्रकरणावरून दिसून आले आहे…