लैंगिक शिक्षण, काळाची गरज…सहज सेवा फाउंडेशनचा सातत्यपूर्ण उपक्रम…

0
5

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे ):- 

सहज सेवा फाऊंडेशनच्यावतीने समाजात विविध उपक्रम राबविले जातात.अन्नसेवा,स्वर्ग रथ सेवा,शव पेटी,वैद्यकीय साहित्य सेवा,सामुदायिक विवाह सोहळा,झाडाखालील शाळा,सायबर क्राईम मार्गदर्शन,नदी पुजन व आरती,पर्यावरण पूरक उपक्रम,कन्या सन्मान सोहळा यासारखे विविध उपक्रम सातत्यपूर्ण राबविले जातात.

खोपोली परिसरातील शाळा व कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शिक्षण हा उपक्रम समाजातील काळाची गरज आहे…या भावनेने सातत्यपूर्ण 8 व्या वर्षी सुद्धा या उपक्रमाचा हिंदी विद्यालय,खोपोली येथून शुभारंभ करण्यात आला…विद्यार्थ्याच्या मनातील सामाजिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी सहज सेवा फाउंडेशन एक हक्काचं सहज व्यासपीठ म्हणून समाजात ओळख ठरविण्यात यशस्वी झाले आहे.

शाळेत व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीमध्ये सामजिक समस्या,लैंगिक समस्या व शंका असतात.आजही समाजात मोकळेपणाने या विषयावर संवाद साधला जात नाही..समाजात असलेल्या अज्ञानामुळे विपरीत परिणाम सुध्दा शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर होत असतात.

सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी समुपदेशन व लैंगिक शिक्षण या विषयावरील मार्गदर्शन दिनांक 04 जुलै 2025  रोजी संपन्न झाले.शहरा प्रति कृतज्ञता भाव मनात ठेवून कार्यरत असणाऱ्या माहेर शीळफाटा खोपोली असुन सद्य स्थितीत पुणे येथे वैद्यकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या डॉ. विशाखा पवार यांच्या अचूक मार्गदर्शनाचा विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शनचा लाभ झाला.यावेळी विदयार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. विशाखा पवार यांनी समर्पक उत्तरे दिली. मोकळेपणाने साधलेल्या उपक्रमात गुड टच, बॅड टच वर देखील मार्गदर्शन करण्यात  आले.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, सचिव अखिलेश पाटील, खजिनदार संतोष गायकर,महिला अध्यक्षा निलम पाटील,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,युवा अध्यक्ष सागरीका जांभळे,आयुषी तिडके तसेच हिंदी महाविद्यालयचे मुख्याध्यापक डॉ.भाईदास पाटील,रेश्मा बांदल,सुप्रिया घोसाळकर,जितेंद्र नरवडे, मीनाक्षी प्रपंडे,निलिया चन्ने,गीता पाटील तसेच शिक्षकेतर स्टाफ यांनी अथक मेहनत घेतली.

लैंगिक शिक्षण हा शैक्षणिक टप्प्यातील महत्त्वपूर्ण घटक असुन विद्यार्थी दशेतील या उपक्रमाने ज्ञानात मोलाची भर पडते.सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा व कॉलेज मध्ये हा उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांना याचा पुढील आयुष्यात नक्कीच उपयुक्त ठरेलं असा आशावाद डॉ. विशाखा पवार यांनी व्यक्त केला.