अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
खारेपाट, पेढाबे 2025 मध्ये होणाऱ्या गोविंदा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खारेपाट गोविंदा पथक (महिला व पुरुष) यांचा सरावाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. या सरावास प्रारंभ देण्यात आला तो अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते…
यावेळी पथकातील युवक-युवतींनी उत्साहात सहभाग घेतला. महिला गोविंदांच्या सहभागामुळे यावर्षीच्या दहीहंडी स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण निर्माण होणार असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. अमित नाईक यांनी सर्व पथक सदस्यांना शुभेच्छा देत सुरक्षिततेच्या दृष्टीने सराव करण्याचे मार्गदर्शन केले.यावेळी उपसंरपच चिंचवला अल्पेश पाटील,अविनाश आचरेकर व आदित्य पाटील,अजिक्य पाटील,व पुरुष व महिला गोविंदा पथकाचे प्रशिक्षक चिन्मय ढवळे हे होते.
कार्यक्रमात गावातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यानिमित्ताने गावामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गोविंदा पथकाने सरावाद्वारे आपली तयारी मजबूत करत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.