अलिबागमधील प्रसिद्ध शाकाहारी अशोका हॉटेल… साधेपणा,स्वच्छता आणि सातत्यपूर्ण दर्जा हॉटेलची ओळख…

0
8

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबागच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं अशोका हॉटेल हे गेली अनेक वर्षं स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचाही खास पसंतीचा ठिकाण ठरलं आहे. या हॉटेलच्या यशामागे आहे सुनिल हरेर यांचं दूरदृष्टीने घेतलेलं नेतृत्व आणि गुणवत्तेवरचा ठाम विश्वास…

साधेपणा, स्वच्छता आणि सातत्यपूर्ण दर्जा ही अशोका हॉटेलची ओळख बनली आहे. इथल्या चविष्ट पद्धतीने तयार होणाऱ्या पारंपरिक शाकाहारी जेवणाची खासियत म्हणजे स्वयंपाकघरात वापरले जाणारे ताजे मसाले, शुद्ध तेल आणि घरगुती पद्धतीने बनवलेली पाककृती. पोळी-भाजी, पुरणपोळी, मसाला भात, आणि वरण-भातासारख्या पारंपरिक पदार्थांनी इथली थाळी सजलेली असते. रविवारच्या खास पाटवड्यांच्या जेवणास अनेक खवय्ये आवर्जून भेट देतात.

सुनिल हरेर यांनी आपल्या व्यवसायात केवळ नफा न बघता, ‘ग्राहक देवो भव’ या मूल्यांना प्राधान्य दिलं आहे.त्यामुळेच हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घरगुती आतिथ्य आणि आदरातिथ्य मिळतं. त्यांच्या व्यवस्थापनाखाली, हॉटेलने वेळोवेळी दर्जामध्ये सुधारणा करत आधुनिकतेची जोड दिली, पण पारंपरिकतेचा गाभा मात्र कायम ठेवला.

आज अशोका हॉटेल हे केवळ जेवणाचं ठिकाण न राहता, एक चविष्ठ अनुभव, परंपरेचा वारसा आणि विश्वासाचं स्थान ठरलं आहे. अलिबागच्या शाकाहारी खाद्यसंस्कृतीचा आत्मा म्हणून हे हॉटेल खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.