मांडवा पोलिसांनी केली रेवस येथे डिझेल तस्करीचा पर्दाफाश… पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी डिझेल तस्करीला आळा घालण्याच्या दिल्या सूचना…

0
11

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, तरीही सागरी सुरक्षा तकलादू असल्‍याचे डिझेल तस्करीतून समोर येत आहे…. डिझेल तस्करीविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर काही जुजबी कारवाया रायगड पोलिस आणि तटरक्षक दलाकडून केल्या जातात; मात्र पुन्हा जैसे थे तस्‍करी सुरू आहे…. याचा प्रत्यय मांडवा पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या रेवस पकटी येथे मासेमारी व्यवसायाच्या नावाखाली डिझेल तस्करीचा पर्दाफाश मांडवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्या यांच्या पथकाने केला आहे….

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर डिझेल तस्करी ही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती…. पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी डिझेल तस्करी याला आळा घालण्याच्या सूचना जिल्ह्यातील पोलिस अधिकारी कर्मचारी यांना दिल्या होत्या….

अलिबाग तालुक्यातील रेवस गावच्या पकटी असलेल्या खाडीमध्ये समर्थ कृपा (निसर्ग दर्शन) नामक मच्छीमारी बोटीमधून डिझेल तस्करी होत असल्याची माहिती मांडवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांना त्यांच्या खबऱ्या मार्फत समजले…. मिळालेल्या माहितीच्या आधारे दीपक भोई यांनी त्याची शहानिशा करीत डिझेल तस्करी बाबत माहिती गोळा करीत त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेवस गावच्या पकटी असलेल्या खाडीमध्ये छापा टाकला असता त्याठिकाणी समर्थ कृपा (निसर्ग दर्शन) नामक मच्छीमारी बोटीमधून डिझेल तस्करीच्या उद्देशाने चार लाख रुपये किमतीचा पाच हजार लिटर डिझेल साठा करून ठेवण्यात आला होता…

मांडवा पोलिसांनी डिझेल साठा सहित रुपये १५०००/- किमतीचा एक होन्डा कंपनीचा लाल रंगाची द्रव पदार्थ उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी मोटार, रुपये १५०००/-रूपये किमतीचा एक होन्डा कंपणीचा जनरेटर, रुपये १०,००,०००/- लाख रूपये किमतीची एक श्री समर्थ कृपा (निर्सग दर्शन) आय एन डी एम एच ३ एम एम ५४६४ क्रमांकाची मच्छीमारी बोट असा एकूण चौदा लाख तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल करण्यात आला आहे… याबाबतचा गुन्हा हा शुक्रवार दिनांक ४ जुलै २०२५ रोजी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे….

या डिझेल तस्करी प्रकरणी मांडवा पोलिसांनी गणेश काशीनाथ कोळी, विनायक नारायण कोळी, मोरेश्वर बामा नाखवा (सर्व रा. बोडणी पो. सारळ ता. अलिबाग जि. रायगड) यांच्या विरोधात हर्षल दिनकरराव देशमुख (वय-४८ वर्षे व्यवसाय – नोकरी (पुरवठा अधिकारी अलिबाग) रा. शुक्रतारा सोसा. पीएनपी बँकेजवळ अलिबाग ता. अलिबाग जि. रायगड) यांनी फिर्याद दाखल केली आहे….

याबाबत मांडवा पोलीस ठाण्यात गू र नं. ८७/२०२५ बीएनएस २८७, ३ (५), सह अत्यावश्यक वस्तू आधी कलम ३, ७, पेट्रोलियम पदार्थ आधी ३ २३ प्रमाणे दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई हे करीत आहेत…. डिझेल तस्कर गणेश कोळी व विनायक नारायण कोळी याच्या विरोधात मांडवा पोलिस ठाण्यात डिझेल तस्करी बाबतचे यापूर्वी सुद्धा गुन्हा दाखल झालेले आहेत…..

जिल्ह्यातील मांडवा, रेवदंडा, अशा वेगवेगळ्या बंदरावर डिझेलची मोठी तस्करी सुरू होती. बोटी मार्फत डिझेल किनारी आणून तो एका गाडीत भरून अन्य ठिकाणी त्याचे वितरण केले जात होते… डिझेलच्या अवैध धंद्यामुळे सागरी सुरक्षा धोक्यात आली आहे…..

मुंबई बंदरात येणाऱ्या मोठमोठ्या जहाजांना भर समुद्रात थांबवून त्यातील डिझेल लुटले जाते…. यात जहाजाच्या अधिकाऱ्यांसोबत तस्करांचे संगनमत असते तर काही वेळ बळजबरीही केली जाते…. जहाजातून लुटलेले डिझेल स्थानिक मच्छीमार, ट्रकचालक यांना विकून कोट्यवधींचा काळाबाजार सुरू होता… यात रायगड जिल्ह्यात चेत्ता , कडीया , म्हात्रे , पारंगे यांच्यासहित रेवस गणेश कोळी सहित काही जणांचा समावेश आहे….

पूर्वी महोम्मद अली आणि चांद मदार तेल तस्करीत सक्रिय होते… चांदची हत्या झाली… महोम्मदअली व त्याच्या टोळीनेही तेल तस्करीतून माघार घेतल्यानंतर नवनवीन डिझेल तस्कर उदयास आले… या तस्कर मध्ये उरण, बेलापूर नवी मुंबई तसेच त्यांना साथ देणारे अलिबाग तालुक्यातील काही लोकप्रतिनिधीं सहित काही मच्छीमार बांधव आहेत…. या सर्वांना राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वरदहस्त असल्याने प्रशासनमधील पोलीस विभागातील अधिकारी मुग गिळून गप्प बसले आहेत…. मालवाहू बोटी मुंबई बंदरात येण्याआधी समुद्रात काही दिवस थांबतात… बोटीवरील कप्तान, व्यवस्थापकांना हाताशी धरून बोटीतील अतिरिक्त इंधन साठा काढून तो बोटीने इतरत्र विकला जातो….

काही वर्षांपूर्वीदोन दशकांहून अधिक क समुद्रातून तेल (डिझेल) तेल तस्करी करणाऱ्याचा मुंबई पोलिसांनी  डिझेल माफिया याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केली होता….दोन वर्षापूर्वी डिझेल तस्कर बाबत रेवदंडा समुद्र किनारी गणेश कोळी नामक व्यक्तीची बोटीवर खोपोली पोलिसांनी कारवाई केली होती….