अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
मुरूड तालुक्यातील कोरलई येथील संशयित बोट प्रकरण समोर आल्यानंतर रायगडची पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. विशेषतः किनारपट्टीच्या भागात अधिक सतर्कता बाळगली जात आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. संशयास्पद वाहनांवर पोलिसांची नजर आहे.