रायगडची सागरी किनारी सुरक्षा रामभरोसे…केवळ चार सागरी गस्ती नौकांवर सुरक्षेची मदार… 

0
13

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-

रायगड जिल्ह्यातील  मुरुड तालुक्यातील कोर्लईच्या समुद्र किनाऱ्यावरील संशयित पाकिस्थानी बोटवर पडदा पडला असला तरी रायगडच्या सागरी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उभे राहिलेत.रायगडच्या 9 सागरी गस्ती नौकांपैकी केवळ चार नौका कार्यरत आहेत. त्यामुळे रायगडची सुरक्षा रामभरोसे असल्याचे बोलले जातेय.कोकण किनारपट्टीला 720 किलोमीटर लांबीचा अथांग व विस्तृत सागरी किनारा लाभलाय,तर रायगडला 122 किलोमीटरची सागरी किनारपट्टी असून आजवरचा सागरी दहशतवादी अतिरेकी कारवाईचा इतिहास पाहता रायगड चे सुरक्षा कवच कायम मजबूत असणे अपेक्षित आहे. रायगड पोलिस दलाकडे आधुनिक सामुग्री आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण बोटींची गरज आहे. रायगडच्या सागर किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी  लवकरात लवकर सक्षम यंत्रणा उभी करण्यात यावी अशी मागणी जोर धरतेय.दरम्यान पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी येत्या आठ दिवसात आम्ही बोटी व साहित्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगितले.