चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम ) :-
महाराष्ट्र राज्य सरकार यांचे कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज खालापूर येथे मोर्चा काढून, निवेदन सादर केले.विविध प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी,निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत,ग्रामपंचायत कर्मचारी, महिला परिचर व कंत्राटी कर्मचारी समन्वय समिती यांच्या वतीने पंचायत समिती खालापूर ते तहसील कार्यालय खालापूर असा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार खालापूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे खालापूर यांना दिनांक ८ जुलै २०२५ रोजी देण्यात आले होते.प्रलंबित मागण्यांचे निवेदन मोर्च्याच्या वेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार खालापूर यांच्यामार्फत देण्यासाठी सादर करण्यात आले.या मोर्चात शिक्षक ,तलाठी, महसूल, भूमि अभिलेख, पंचायत समिती, व इतर संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.