कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके) :-
कोल्हारे ग्रामपंचायत येथे आरोग्याच्या निगडित तसेच मान्सून काळातील सर्व प्रोटोकॉल सांभाळणे यासाठी ग्रामपंचायत कार्यसम्राट सरपंच महेश विरले पुन्हा चर्चेत आले आहेत…कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्व ठिकाणी काँक्रेट रस्ता झाल्यामुळे व अतिवृष्टीमुळे या भागांमध्ये पाय घसरून पडणे असे प्रकार घडत आहेत…या अनुषंगाने सरपंच महेश विरले यांनी स्वतः ठिकठिकाणी जागेवर जाऊन ब्लिचिंग पावडर व पाणी शुद्धीकरण करण्याकरता वापरण्यात येणारे क्लोरीवेट तसेच तूरटी ही प्रत्येक घरोघरी देण्याचे उपक्रम राबवित आहेत..ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिक यामुळे आनंदित आहेत व यापुढे देखील महेश विरले यांनी असेच काम करत राहावे अशी इच्छा प्रकट केली आहे…